Press Releases
rummytu.in in Lokmat « Back

रमी आणि तीन पत्ती घेताहेत डिजिटल गेम्समध्ये आघाडी
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 15 - डिजिटल खेळांमध्ये असलेली पाश्चात्य मक्तेदारी रमी आणि तीन पत्तीसारखे भारतीय खेळ मोडीत काढत असून 2020 मध्ये या बाजारपेठेत भारतीय खेळांचा हिस्सा 54 टक्के असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आत्ता आत्तापर्यंत बहुतांश खेळ विकासक यूएस आणि इतर युरोपिय बाजारपेठांसाठी खेळांची निर्मिती करायचे आणि मग सगळ्यात शेवटी ते खेळ भारतात आणायचे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये.
पारंपरिक भारतीय खेळ भारतात डिजिटल खेळांची जागा घेत आहेत. खरं तर भारतीय खेळांचे विकासक हे त्यांच्या स्थानीय खेळांच्या साहाय्याने खेळ प्रकाराला भारी पडत आहेत. रमी आणि तीन पत्तीसारखे लोकप्रिय खेळांची डिजिटल खेळांना ते ओळख करून देत आहेत.
प्ले गेम्स 24x7 चे सीईओ भाविन पंड्या म्हणाले की, ``लोकांना त्यांच्या वाढत्या वयात खेळलेले खेळ पुन्हा खेळायला आवडतायंत. स्थानिकीकरण हा भारतातील यशाचा मार्ग आहे आणि सध्याचे ट्रेंड्सही तेच सिद्ध करतायंत. आम्ही खेळांच्या स्थानिकीकरणाकडे आणि वापरायला सोप्या तंत्रज्ञानाकडे सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही आमचे खेळ हे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देत आहोत.'' प्ले गेम्स 24x7तर्फे रमीसायकलमार्फत रमी आणि तीन पत्ती हे खेळ सादर करण्यात आले आहेत, रमी आणि पोकर हे सगळ्यात जास्त खेळले जाणारे खेळ असून, या खेळाचे इतर खेळांच्या तुलनेत एकूण 5 दशलक्ष डाऊनलोड्स झाले आहेत.
मुंबईतील मॅनेजमेंट कन्सल्टंट रवींद्र सिंग सांगतात की, ``मित्र, भावंडं यांच्यासह सणासुदीला किंवा गेटटुगेदर्सना रमी खेळल्याच्या अनेक रम्य आठवणी माझ्याकडे आहेत. पण अलीकडे आपण कामाच्या रगाड्यात आणि कौटुंबिक आयुष्यात बुडून गेलो आहोत. परंतु, आता या नवीन मोबाइल कार्ड गेमच्या अॅपमुळे कुठेही, कधीही, अगदी प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा रविवारी दुपारीसुद्धा माझ्या लाडक्या खेळाचा आस्वाद घेऊ शकतो.''
ग्लोबल रिसर्च फर्मच्या म्हणण्यानुसार, भारतात 200 दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. परवडणा-या किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध होत असल्याने, हे शक्य झाले आहे. भारतातील या वाढत्या स्मार्टफोन आणि टॅबलेट्सच्या संख्येमुळे, खेळांसाठी मोबाइल हे सगळ्यात महत्त्वाचे व्यासपीठ झाले आहे याद्वारे 2020 पर्यंत खेळांतील 54 टक्के भागीदारी ही भारतीय खेळांच्या बाजारपेठांकडे असेल.
- एकूणात वापरकर्ते दिवसातील किमान 11 मिनिटं तरी मोबाइल खेळांमध्ये घालवतात.
- मोबाइलमधील खेळ हे जास्तीत जास्त प्रादेशिक भाषांमध्ये आणण्यावर विकासकांच लक्ष.
- स्थानिक भाषांमध्ये खेळांची निर्मिती केल्याने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये अंदाजे 39 टक्के वाढ.
- ग्रामीण भागात ही वाढ जास्त प्रमाणात होते आहे (75 टक्के), तर भारतातील शहरी भागांत ही वाढ 16 टक्के आहे.
- मोबाइल खेळांची बाजारपेठ 2017 साली 18.5 अब्ज रूपये इतकी वाढेल अशी अपेक्षा आहे.
Date: 15-March-2016, मुंबई
Source: http://www.lokmat.com/storypage.php?catid=4&newsid=11816893
Games24x7.com has now become rummytu.in